12 November 2019

News Flash

पुणे : नेपाळी नोकर दांपत्याने गुंगीचे औषध देऊन 8 तोळं सोनं केलं लंपास

नुकताच बंगला मालकाने गृहप्रवेश केला होता

( चोरी झालेला बंगला )

नेपाळी नोकर दांपत्याने जेवणात गुंगीचे औषध देऊन बंगला मालकासह वृद्ध दाम्पत्याला बेशुद्ध करून लाखो रुपये आणि सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी(दि.12) संध्याकाळी 7.45 च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दीपक नेरकर (वय-50), काशिनाथ नेरकर (वय-77), सुमनबाई नेरकर (वय-67) असं बेशुद्ध झालेल्या मुलाचे आणि आई वडिलांचे नाव आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नेरकर यांनी पिंपरीमधील महेश नगर येथे कुटुंबासह नुकताच गृहप्रवेश केलेला होता. तर, नेपाळी नोकर दांपत्य हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्याकडे काम करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.  सकाळी पत्नी पुण्यात दोन्ही मुलींकडे गेली होती. घरात नेपाळी नोकर दांपत्य आणि मुलगा, वृद्ध आई वडील होते. दुपारी नोकर दांपत्याने जेवणात गुंगीचे औषध दिले. काही वेळानंतर ते बेशुद्ध झाले, याच संधीचा फायदा घेत त्यांनी घरातील कपाटातील मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पाठीमागील दरवाजाने पळ काढला. दुपारी साडेतीन नंतर पत्नी मुलीसह घरात आली. मात्र, सर्वजण झोपले असतील असं वाटल्याने त्यांनी त्यांना त्रास देणे टाळले. परंतु, संध्याकाळी सात वाजले तरी घरातील व्यक्ती का उठत नाहीत हे पाहण्यासाठी गेल्यानंतर सर्व घटनेचा उलगडा झाला. तिघांना जवळच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील उपचार आहेत. तर पिंपरी पोलीस हे नेपाळी नोकर दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

First Published on June 12, 2019 9:35 am

Web Title: pune nepali thief couple stolen gold and cash sas 89