News Flash

पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग

अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. काही भागाचे या आगीमुळे नुकसान

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली

पुण्यातील ब्रिटिश कालीन महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामन दल घटनास्थळी जाऊन दाखल झाले. मात्र तोपर्यंत आतील काही भाग जळून खाक झाला होता. अग्नीशामन दल्याच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:17 am

Web Title: pune news mahatma phule mandai fire svk 88 scsg 91
Next Stories
1 साथरोगांवर नियंत्रणासाठी सतर्कता नकाशा
2 खासगी विद्यापीठांतील प्रवेशांसाठीची ‘पेरा सीईटी’ १६ ते १८ जुलैदरम्यान
3 मुदत संपली, रस्ते दुरुस्ती सुरूच
Just Now!
X