सोन्याचा मोह कुणाला नाही होतं. त्यामुळे अनेकजण अंगावर सोनं घालून लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्याच्या अनेक गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील…. पण, ही गोष्ट वेगळी आहे. इथे गड्यानं लोकांच्या दाढ्या करण्यासाठी ८ तोळ्याच्या सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. त्यामुळे आळंदीतील अविनाश बोरूदिया यांच्या नावाची गावासह पिंपरी-चिंचवड परिसरात चर्चा होतेय. ते शंभर रुपयात सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून देतात. कुतूहलापोटी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातून हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.

अविनाश बोरूदिया हे मूळ व्यवसायिक असून, त्यांनी युवराज कोळेकर आणि विक्की वाघमारे या दोन तरुणांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलूनचे दुकान सुरू केले. दरम्यान, दुकानाच्या नावाप्रमाणेच काहीतरी हटके करण्याची कल्पना अविनाश यांच्या डोक्यात होती. त्यानुसार, भारतीय संस्कृतीत महत्वाचं स्थान असलेल्या सोन्याच्या धातूची निवड त्यांनी केली. त्यांनी राजस्थान येथील कारागिरांकडून ८ तोळे सोन्याचा वस्तरा बनवून घेतला. ज्याची किंमत तब्बल ४ लाख इतकी आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

‘रुबाब’चे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले आणि अवघ्या शंभर रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने ग्राहकांची दाढी करून द्यायला लागले. बघता बघता, अवघ्या आळंदीसह पंचक्रोशीत सोन्याच्या वस्तऱ्याची चर्चा सुरू झाली. जो तो कुतूहलाने याकडे पहात असून, या महागाईच्या काळात देखील सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून मिळत असल्याने ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत. भविष्यात रुबाब सलूनमध्ये सोन्याची कात्री करण्याचा मानस असल्याचं अविनाश यांनी सांगितलं. त्यामुळे काही दिवसांनी कटिंग देखील सोन्याच्या कात्रीने होईल यात काही शंका नाही…!