News Flash

रवींद्र बऱ्हाटे टोळीवर पुन्हा ‘मोक्का’ कारवाई; मुख्य सूत्रधार बऱ्हाटे फरार

दोन महिन्यांत सात ‘मोक्का’

संग्रहित छायाचित्र

जमीन बळकावणे, खंडणी, धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पुण्यातील रवींद्र बऱ्हाटे टोळीवर आणखी एका गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. मुख्य सूत्रधार बऱ्हाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. बऱ्हाटे याच्या पाच मालमत्ता प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने जमीन बळकावणे, फसवणूक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर पुन्हा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी रवींद्र बऱ्हाटे (रा. मधुसूदन अपार्टमेंट, लुल्लानगर), बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार (दोघे रा. सोमवार पेठ पोलीस वसाहत), कथित पत्रकार देवेंद्र जैन (प्रियदर्शिनी सोसायटी, सिंहगड रस्ता), प्रशांत जोशी (रा. कृष्णलीला सोसायटी, कोथरूड), प्रकाश फाले (रा. हिरकणी सोसायटी, जुनी सांगवी), विशाल तोत्रे (रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत), संजय भोकरे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, धनंजय सोसायटी, कोथरूड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी विभागाचे सहायक आयुक्त रमेश गलांडे यांनी बऱ्हाटे टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

दोन महिन्यांत सात ‘मोक्का’

मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुंड टोळ्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनीही या टोळ्याविरोधात कडक भूमिका घेतली असून, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड टोळ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत सात टोळ्यांवर मोक्का कारवाई केल्याने गुंड टोळ्यांना जरब बसली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 11:12 am

Web Title: pune news pune police registered mcoca case against ravindra barhate gang bmh 90
Next Stories
1 दहावी-बारावी परीक्षा नियोजनासाठी समिती
2 Coronavirus : पुण्यात दिवसभरात ९६३ नवीन करोनाबाधित, चार रुग्णांचा मृत्यू
3 ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन
Just Now!
X