News Flash

पुणे : डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

एअर होस्टेसवर दारू पाजून बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. २९ वर्षीय तरुणाने ३० वर्षीय महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांची ओळख टिंडर डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. लग्नाचं आमिष दाखवून आरोपींने अनेकवेळा बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने बलात्कार केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेनं फिर्याद दाखल केली असून, अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दोघांची टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाली. त्यानंतर मागील वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपी एका खासगी कंपनी कामाला आहे. महिला विधवा असून, गृहिणी आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

आणखी वाचा- धक्कादायक! कुटुंबियांसोबत पुण्यातल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती तरुणी, पण वेटरने…

“दोघांचं एकमेकांशी बोलणं होण्यापूर्वी आणि भेटीपूर्वी आरोपीने लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर आरोपीनं अनेक वेळा बलात्कार केला. जेव्हा महिलेनं आरोपीकडे लग्नाबद्दल विषय काढला, तेव्हा त्याने बूट फेकून मारला आणि महिलेवर हल्ला केला,” असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६(२)(न), ३७७ आणि ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही अशाच घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती. वाकड पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. टिंडरवर ओळख झाल्यानंतर आरोपीने एअर होस्टेलवर दारू पाजून बलात्कार केला होता. त्याचबरोबर मारहाणही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 11:44 am

Web Title: pune news woman files rape complaint against man she met on dating app bmh 90
Next Stories
1 पुणे : दोन भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी
2 राज्यात पावसाचा तेरावा महिना
3 पुणे : मंडईतील शारदा गजानन मंदिरातील दागिने चोरणारा आरोपी अखेर जेरबंद
Just Now!
X