पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरीत सिद्धार्थ बनसोडेवर अटकेची कारवाई करत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निगडी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. सिद्धार्थ बनसोडेसह सतीश लांडगे, सावनकुमार सलादल्लू, रोहित पंधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन जीवघेणे हल्ले केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जीवघेण्या हल्ल्यांप्रकरणी फरार असलेल्या सिद्धार्थ बनसोडेला इतर साथीदारांसोबत रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना फरार झालेला सिद्धार्थ बनसोडे रत्नागिरीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांची दोन पथकं त्या ठिकाणी गेली. तिथे सापळा रचून सिद्धार्थसह इतरांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

गोळीबार प्रकरण नेमकं काय आहे?
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर १२ मे रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या तानाजी पवार याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, काही तासांनी तानाजी पवार याने अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

तर, गोळीबार घटना घडण्याच्या एक दिवस अगोदर सिद्धार्थ बनसोडे याने निगडी येथील हेडगेवार भवन येथे टोळक्यासह जाऊन पवार कोठे आहे अशी विचारणा करून तेथील कामगारांना मारहाण केली अशीही तक्रार करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी सिद्धार्थ हा फरार होता. अखेर त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.