News Flash

पुणे: ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी एकवटले; केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दीर्घकालीन संपावर

केंद्र सरकारच्या विरोधात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

पुण्यातील देहूरोड आणि खडकी येथील आयुध निर्माण करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीसमोर कर्मचारी वर्ग, संघटना हे केंद्रसरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकार हे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. देहूरोड येथे मानवी साखळी करत सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून एक महिन्याच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकार हे देशातील आणि राज्यामधील ऐकून ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरणाच्या वाटेवर असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशावेळी कामगार संघटना, कर्मचारी, अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संबंधित विषयावर परस्पर निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण १० ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. त्यापैकी तीन या पुणे परिसरात आहेत. यात एकूण ५० हजार कर्मचारी काम करत असून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका याचमधून चालते.

तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले, सर्व केंद्र शासित पोलीस दलांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवण्याचे काम केले या फॅक्टरीच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, सद्य स्थितीला केंद्र सरकारने सर्व भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीना खासगीकरणाचा घाट घातला आहे. देशभरात एकूण १ लाख कर्मचारी हे त्यावर अवलंबून आहेत, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान, यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून आज पासून एक महिना केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी संपावर जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 11:06 am

Web Title: pune ordnance factory employees on strike for month against privatization central government jud 87
Next Stories
1 भाजपच्या शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ
2 राज्यातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी शाळाबाह्य़
3 महापुरामुळे निवडणुका पुढे ढकलल्या तर काय बिघडेल?
Just Now!
X