जिल्ह्य़ात १५० रुग्णांचा मृत्यू

पुणे : सोमवारी जिल्ह्य़ात करोनाच्या ७६६२ नवीन रुग्णांची नोंद  झाली, त्यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या आठ लाख ६८ हजार ५०६ झाली आहे. दिवसभरात पुणे जिल्ह्य़ातील १५० रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून, त्यामुळे जिल्ह्य़ातील मृतांची एकूण संख्या १३,५४६ झाली आहे. रविवारी रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांचे संकलन कमी झाल्यामुळे सोमवारी रुग्णसंख्येत ही घट दिसत आहे.

Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
in pune Gavathi liquor making in Nursery
पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा

दिवसभरात आढळलेल्या ७६६२ रुग्णांपैकी २५७९ रुग्ण पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात २१०२ जणांना करोनाची लागण झाली आहे. पुणे जिल्ह्य़ाच्या उर्वरित भागात २९८१ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरातील ६१, पिंपरी-चिंचवडमधील ५९ आणि उर्वरित जिल्ह्य़ातील ३० रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात ४०४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,८२,५१८ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील २३६३ रुग्ण सोमवारी बरे होऊन घरी गेले.

पुणे – २५७९ नवे रुग्ण, ६१ मृत्यू

पिंपरी-चिंचवड – २१०२ नवे रुग्ण, ५९ मृत्यू

उर्वरित जिल्हा – २९८१ नवे रुग्ण, ३० मृत्यू