News Flash

Cctv: बूट चोरांनंतर आता पेट्रोल चोरांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी

दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना उघड

पिंपरी-चिंचवड शहरात भुरट्या चोरांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. निगडी शहरात उच्चभ्रू वसाहतीत बूट चोरीचे प्रकार यापूर्वी घडले होते. त्यानंतर आता शहरातील अन्य ठिकाणी वाहनातील पेट्रोल चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेड समोर आली असून ती पिंपरी परिसरातील आहे. अद्याप मात्र याप्रकरणी पोलिसात कोणत्याही व्यक्तीने तक्रार दिलेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात बूट चोरीनंतर पेट्रोल चोरांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. निगडी परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत ब्रँडेड शूज चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी परिसरात मोटारीतील, दुचाकीमधील पेट्रोल चोरीच्या घटना घडत असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पिंपरीच्या कामगार नगर भागातील मदन मोहन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या अगोदर देखील सोसायटीत पेट्रोल चोरीची घटना घडली असल्याची माहिती तेथील व्यक्तींनी दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास इमारतीच्या खाली पार्क केलेल्या वाहनातील आणि दुचाकीतील पेट्रोल अज्ञात व्यक्ती काढून घेत आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीने अद्याप पोलिसात तक्रार दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 3:18 pm

Web Title: pune petrol thief captured in cctv pimpri chinchwad nigdi jud 87
Next Stories
1 पूरग्रस्तांना आळंदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे १० लाखांची मदत
2 डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : हमीद दाभोलकर
3 पुणे: ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी एकवटले; केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दीर्घकालीन संपावर
Just Now!
X