News Flash

पुण्यात शिवभोजन थाळी कुठे मिळेल?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शिवभोजन थाळीचं उद्घाटन झाले

संग्रहित छायाचित्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शिवभोजन थाळीचं उद्घाटन झाले. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी अकरा वाजता पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात या योजनेला सुरूवात झाली. पुण्यात सात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चार ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी बारा ते दोन या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.

आणखी वाचा : पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उदघाटन

पुण्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी?

पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा
कौटुंबिक न्यायालय
कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह
स्वारगेट एसटी स्थानक
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११
महात्मा फुले मंडई
हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय

पिंपरी चिंचवडमध्ये कुठे मिळणार? –

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपाहारगृह
यशवंतराव चव्हाण रुग्णालय
वल्लभनगर बसस्थानक
पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल.

वरील सर्व ठिकाणी योजनेचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. गरीब कोणाला म्हणावे, याबाबत व्याख्या करता येणार नसल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या योजनेंतर्गत जेवणाचा लाभ सर्वाना द्यावा, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 12:42 pm

Web Title: pune pimpari shivbhojan thali nck 90
Next Stories
1 शिवथाळी पुणेकरांच्या सेवेत; ११ ठिकाणी मिळणार थाळी
2 अनुभवशून्य उद्धव ठाकरेंमुळं राज्य अधोगतीकडे जाईल – नारायण राणे
3 ‘निपा’चा नि:पात दृष्टिपथात
Just Now!
X