News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये करोना योद्धा डॉक्टररूपी देवीची साकारण्यात आली रांगोळी

१० किलो रांगोळी वापरत साकारली देवी

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये एका रांगोळी कलाकाराने डॉक्टररूपी देवीची भव्य रांगोळी साकारली आहे. याद्वारे कलाकारानं करोना योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याच प्रयत्न केला आहे. भूषण खंडारे असं रांगोळी साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे. रांगोळीमध्ये साकारण्यात आलेल्या देवीने मास्क परिधान केले असून हातामध्ये डॉक्टर उपाचारासाठी वापरत असलेले साहित्य हे शस्त्र म्हणून दाखविण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून भव्य डॉक्टररुपी देवी रांगोळीतून साकारण्यात आली आहे. दोन तास अथक मेहनत घेत ही रांगोळी साकारण्यात आली असून यासाठी दहा किलो रांगोळी वापरली असल्याचं भूषणनं सांगितलं. करोना योद्धे डॉक्टर यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव होता तेव्हा आपलं कर्तव्य चोख बजावलं असून त्यांच मनोबल वाढविण्यासाठी ही रांगोळी साकारल्याचंही त्यानं नमूद केलं.

भूषणनं त्यांच्या मामाकडून रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच तो शॉर्टफिल्मचं देखील काम करत असल्याचं त्यानं सांगितलं. भोसरीमध्ये साकारलेली ही रांगोळी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कलाकार आणि करोना योद्धे डॉक्टरांचही सर्वांकडून कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 5:38 pm

Web Title: pune pimpri chinchwad artist corona yodha goddess rangoli 10 kilos of colour goes viral kjp 91 jud 87
Next Stories
1 पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
2 लग्नास नकार देणार्‍या तरुणीवर ॲसिड हल्ल्याची धमकी
3 पुणे-मुंबई प्रवासासाठी भुर्दंड
Just Now!
X