पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ४१८ करोना रुग्ण आढळल्याने १ लाख ५७ हजार ५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ हजार ९६४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ८६० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.  १ लाख ४३ हजार २२९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २२८ करोना बाधित रुग्णांची नोंद
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २२८ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ३५५ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ३२३ वर पोहचली असून पैकी ८१ हजार १०७ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २,०१० एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.