News Flash

Coronavirus: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात ७ जणांचा मृत्यू

पुण्यात गेल्या २४ तासांत २०१ नवे रुग्ण

संग्रहीत

राज्यातील करोना परिस्थिती आटोक्यात येत असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मिळून दिवसभरात ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात दिवसभरात २०१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १ लाख ८५ हजार ५५८ इतकी झाली. पुण्यात दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ४ हजार ७५३ इतकी झाली आहे. तर २०४ जणांनी दिवसभरात करोनावर मात केली असून करोनामुक्त व्यक्तींची एकूण संख्या १ लाख ७८ हजार ७९५ इतकी झाली आहे.

Coronavirus: राज्यात दिवसभरात २,६१३ जणांची करोनावर मात

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १११ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण ४४ जण करोनामुक्त झाले. दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ११७ वर पोहोचली असून त्यापैकी ९६ हजार ४८८ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ५७१ एवढी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 10:03 pm

Web Title: pune pimpri chinchwad coronavirus update dated 29 jan 2021 svk 88 kjp 91 vjb 91
Next Stories
1 “भाजपाची सत्ता येणार असं फडणवीस म्हणाले की समजून जा…”
2 “अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं आणि…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा
3 ‘सायकल मार्गा’च्या नावाखाली उधळपट्टी कायम
Just Now!
X