News Flash

पुणे: जवानाने रायफल मधून स्वत:वर गोळया झाडून केली आत्महत्या

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड येथील मिलिटरी कॅम्प मधील जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड येथील मिलिटरी कॅम्प मधील जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नरेंद्र सिंग अस आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे पंजाब येथील असून देहूरोड मिलिटरी कॅम्प मध्ये राहात होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्यावर असणारे मृत नरेंद्र सिंग हे ११ नंबर गार्ड पोस्टवर तैनात होते. त्यांच्याकडे असणाऱ्या ऑटोमॅटिक रायफल मधून दुपारी गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, ऑटोमॅटिक राफायल मधून एकाच वेळी तीन गोळ्या फायर होतात, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वीच ते डीएमडी मिल्ट्री कॅम्पमध्ये रुजू झाले होते. याआधी ते दिल्लीत कार्यरत होते अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 7:11 pm

Web Title: pune pimpri chinchwad military camp soldier suicide dmp 82
Next Stories
1 दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर
2 धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याचे प्रकार सुरूच
3 ‘व्यक्तिविशेष’ खंडाचा भाग अभ्यासकांसाठी खुला
Just Now!
X