29 January 2020

News Flash

पुणे: वाहनांची तोडफोड करणारे टोळके काही तासात पोलिसांनी केले जेरबंद

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात अज्ञात दहा जणांच्या टोळक्याने तब्बल वीस वाहने लाकडी दांडके, कोयते आणि दगडांनी फोडल्या होत्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात अज्ञात दहा जणांच्या टोळक्याने तब्बल वीस वाहने लाकडी दांडके, कोयते आणि दगडांनी फोडल्या होत्या. या प्रकरणी अवघ्या काही तासातच दहा आरोपींना निगडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पूर्ववैमनस्यातून ही तोडफोड झाल्याचे निष्पन्न झाले.

विशाल ठाकूर, ओंकार काटे, राजरत्न सोनटक्के, ऋतिक रुपटक्के, प्रणव कांबळे, अमन पुजारी, हर्षल लोहार, शुभम सोनवणे, प्रज्वल मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एका मित्राच्या वाढदिवस करून आल्यानंतर दहा जणांच्या टोळक्याने आकुर्डी परिसरात तब्बल वीस गाड्यांची तोडफोड केली. त्यांच्याकडे कोयता, लाकडी दांडके अशी घातक शस्त्रे होती. दिसेल ती गाडी आरोपींनी फोडली आहे. दरम्यान, चव्हाण आणि सिद्धार्थ परब नावाच्या व्यक्तीचे दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून दहा जणांचे टोळके आकुर्डी गावठाण येथे चव्हाण नावाच्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते.

परंतु, तो न भेटल्याने रागाच्या भरात परिसरात दिसेल ती गाडी आरोपींनी फोडली. याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अवघ्या काही तासात निगडी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे, सहाययक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे पोलीस कर्मचारी विलास केकान, साठे, प्रवीण मुळूक, बोडके, घनवट या कर्मचाऱ्यांनी केली आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

First Published on August 24, 2019 7:55 pm

Web Title: pune pimpri chincwad cars break accused arrest dmp 82
Next Stories
1 देशातील ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे
2 भाजप सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी : बाळासाहेब थोरात
3 CCTV: पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
Just Now!
X