पिंपरी (पुणे) येथे एका दीड वर्षाच्या चिमुकलीने बटन सेल गिळल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रांती पवार असे या चिमुकलीचे नाव असून तिच्यावर खासगी रूग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सुरू आहे. आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास घरात खेळत असताना या मुलीने बटन सेल गिळला. कुटुंबीयांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी लगेचच तिला रूग्णालयात दाखल केले. यापूर्वीही शहरात चिमुकल्यांनी सेल गिळल्याचे प्रकार घडले होते.

आज सकाळी १०.३० च्या दरम्यान क्रांती पवार ही एक वर्षाची चिमुरडी नकली मोबाईल सोबत खेळत होती,अचानक खेळता खेळता तो खेळण्याचा मोबाईल क्रांतीच्या हातातून पडला आणि त्याच्यातील सर्व सेल खाली पडले,हि घटना तिच्या आजीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी या नकली मोबाईल बद्दल विचारणा केली आणि या मोबाइल मध्ये तीन सेल असतात याची खात्री करून घेतली. मात्र त्यामध्ये फक्त दोनच सेल असल्याचे क्रांतीची आजी छबूताई पवार यांच्या लक्षात आले.त्यामुळे क्रांतीच्या आजीला सेल गिळल्याचा संशय आला आणि क्रांतीला चिंचवडच्या खाजगी रुग्णालयात आणले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही बाब लक्ष्यात आली की, क्रांतीने सेल गिळला आहे, त्यानंतर क्रांतीवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया झाली असून तिची तब्येत आता बरी आहे, अशी माहिती क्रांतीचे चुलते संतोष पवार यांनी दिली आहे..