पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पुलावर मंगळवारी दुपारी पीएमपी बसने अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाने व्यक्त केली. अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी वरुन कोथरूडकडे एमएच १२, एचबी १६१४ या क्रमांकाची पीएमपीची बस निघाली होती.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही बस संचेती हॉस्पिटल लगत असलेल्या पुलावर आली असताना या बसच्या मध्य भागात असणार्या बॅटरीमधून धूर येण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर चालकाने बस बाजूला घेतली असता काही मिनिटात बसने पेट घेतला. तर काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 5:43 pm