05 March 2021

News Flash

पुणे: गजानन मारणेनंतर शक्ती प्रदर्शन करणारा कुख्यात गुंड शरद मोहोळला अटक

शरद मोहोळ येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर एका संघटनेच्या....

पुण्यातील गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले. त्या घटनेनंतर काही तासात पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आता खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने एका कार्यक्रमा दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

गुंड शरद हिरामण मोहोळ वय 38, विश्वास बाजीराव मनेरे वय 37, मनोज चंद्रकांत पवार वय 42,स्वप्निल अरुण नाईक वय 35 आणि आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. या सर्वाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या गुन्ह्यातून शरद मोहोळ येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी 26 जानेवारी रोजी बोलविण्यात आले होते.

त्यावेळी शरद मोहोळ याच्या सोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुंड शरद मोहोळ सह पाच जणांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 1:19 pm

Web Title: pune police arrest criminal sharad mohol svk 88 dmp 82
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड: कडाक्याच्या थंडीत कोविड योद्ध्यांचे बेमुदत उपोषण
2 दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
3 ‘स्वच्छ’ला महिन्याची मुदतवाढ
Just Now!
X