News Flash

पुण्यात छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक

पोलिसांना त्याच्याकडे एक पिस्तुल आणि २ काडतुसे मिळाली.

पुणे पोलिसांनी गुरूवारी छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक केली. छोटा राजन टोळीचा सदस्य असणारा प्रशांत वनशिव धायरी येथे येणार असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रशांत वनशिव याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना त्याच्याकडे एक पिस्तुल आणि २ काडतुसे मिळाली. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. २५ ऑक्टोबरला छोटा राजनला बाली येथे अटक करण्यात आली होती व नंतर सीबीआयने त्याला ताब्यात घेऊन भारतात आणले होते. छोटा राजनला सध्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. भारत-तिबेट सीमा दल व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तुरूंगाबाहेर तैनात करण्यात आले असून बाहेरून कुठल्याही गोष्टी त्याला मिळू नयेत याची काळजी घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 9:41 am

Web Title: pune police arrested chhota rajan gang member
Next Stories
1 ‘माळढोक’मधील काळविटांची स्वतंत्र गणना!
2 ‘डीवाय’च्या छापासत्रांमागे लाखोंच्या पदव्यांची बोली?
3 माता अमृतानंदमयी मठाकडे एक कोटीची थकबाकी
Just Now!
X