News Flash

खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात चोरी करणाऱ्यांना अटक

सराफी दुकानात शनिवारी दुपारी नागपुरे आणि तिचा साथीदार कछवाई हे खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरले.

एका महिलेसह दोघांचा समावेश
खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानातून सोन्याची कर्णफुले चोरणाऱ्या महिलेसह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून धानोरी येथील सराफी दुकानात ही घटना घडली.
मंजिरी प्रशांत नागपुरे (वय ३४, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) आणि चेतन बाबुलाल कछवाई (वय २९, सध्या रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा, मूळ रा. गुजरात) अशी अटक क रण्यात आलेल्यांची नावे आहेत. संतोष माणिक बाबर (वय २९, रा. धानोरी ) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
बाबर यांचे धानोरी येथे माऊली ज्वेलर्स हे सराफी दुकानात शनिवारी दुपारी नागपुरे आणि तिचा साथीदार कछवाई हे खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरले. बाबर यांना दागिने दाखविण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून दोघांनी कर्णफुले लांबविली. बाबर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोघांना शिवाजीनगर सत्र न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना मंगळवापर्यंत ( २८ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 4:10 am

Web Title: pune police arrested gang in jewelry store robbery
Next Stories
1 वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने साठ लाखांचा गंडा
2 अकरावीप्रवेश : विज्ञान शाखेपेक्षाही विद्यार्थ्यांचे वाणिज्य शाखेला प्राधान्य
3 नगरसेवकाविरूद्ध माऊंट कारमेल शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांचे आंदोलन
Just Now!
X