News Flash

पुणे : फळांच्या खाली लपवून आणला १ हजार ८७८ किलो गांजा! ६ जणांना अटक

पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून लपवून आणला जात असलेला १ हजार ८७८ किलो गांजा जप्त केला आहे.

cannabis confiscated in pune
पुण्यात गांजाचा मोठा साठा जप्त

पुण्यामध्ये तब्बल १ हजा ८७८ किलोंचा गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडला असून या कटात सहभागी असलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या मालाची एकूण किंमत जवळपास ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा दाखल करण्याचा या टोळक्याचा प्लॅन फसला आहे. या प्रकरणी अजून काही लोकांचा समावेश आहे का? याचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत.

अननस, जॅक फ्रूटच्या खाली लपवला गांजा

पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये १ हजार ८७८ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गांजाची किंमत ३ कोटी ७५ लाख रुपये आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे.

आंध्रप्रदेशातून आणला होता गांजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरून टीएस ०७ यूएए ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले. त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता. त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी किंमत होत असल्याचे सांगण्यात आले. तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी आंध्रप्रदेशातून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 10:32 pm

Web Title: pune police confiscated huge amount of cannabis on truck arrested 6 person svk 88 pmw 88
टॅग : Crime News
Next Stories
1 ‘गो करोना गो’ म्हणत होतो! मात्र, मलाच करोना झाला, त्यामुळे आता…” आठवलेंचा नवीन डायलॉग
2 हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज; रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट
3 पुण्यात IISER च्या दुसऱ्या मजल्यावर आग
Just Now!
X