News Flash

पुणे : मौजमजा करण्यासाठी प्रोफेशनल डान्सरसह तिघांनी चोरल्या 25 दुचाकी

शहरात 25 दुचाकी चोरल्याची दिली कबुली

पुणे शहरातील विविध भागात मागील सहा महिन्यांमध्ये 25 दुचाकी चोरणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका प्रोफेशनल डान्सरचाही समावेश असून या सर्व आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

संजय हरीष भोसले ऊर्फ सोन्या (वय 20 रा. शेवाळवाडी), हृषिकेश बाबासाहेब डोंगरे ऊर्फ बिटू (वय 19 रा. शेवाळवाडी), अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु (वय 19 रा. नऱ्हे आंबेगाव) आणि अजित कैलास कांबळे ऊर्फ विठ्ठल (वय 21 रा. शेवाळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा चौकात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये चारजण संशयितपणे फिरत असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चौघेजण गाड्यांची पाहणी करताना दिसले. त्या चौघांकडे चौकशी केली असता, शहरात 25 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. या चोर्‍या मौजमजा करण्यासाठी केल्या असून यातील आरोपी अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु हा तरुण प्रोफेशनल डान्सर आहे. त्या आरोपीने अनेक स्टेज शो आणि काही माहितीपटांमध्येही काम केले आहे. आरोपींकडे अजून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली केली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 2:37 pm

Web Title: pune police crime bike thief gang arrested svk 88 sas 89
Next Stories
1 ‘ते’ मनसे कार्यकर्ते अडचणीत; पकडलेल्या नागरिकाने केली पोलिसांत तक्रार
2 ‘रेडीरेकनरचे दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील’
3 औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरांना मोक्का लावण्याचे अजित पवारांचे आदेश
Just Now!
X