News Flash

VIDEO: हिंजवडीत पोलीस कर्मचाऱ्याची दारूसाठी दादागिरी

घटना सीसीटीव्हीत कैद

दारू न दिल्याच्या रागातून पुणे पोलिसांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने हिंजवडीमधील हॉटेलमध्ये दादागिरी केल्याचे समोर आले आहे. हॉटेल मालकाला मारहाण करत दमदाटी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी रामकीसन रमेश खैरनार (३२) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस कर्मचारी अक्षय धुमाळसह अजय खोत आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना सदर पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हे त्याच्या इतर चार मित्रांसह तेथे मध्यरात्री आले. ”आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस,” असे म्हणत मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच यावेळी त्यांनी त्या हॉटेलनजीक असलेल्या अन्य दुकानाचेही नुकसान केले.

पाहा व्हिडीओ:

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. मात्र, अशा पोलीस कर्मचाऱ्यामुळे सर्व पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदनामी होत होत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 1:46 pm

Web Title: pune police employee fights with hotel owner for liquor jud 87
Next Stories
1 पुणे : “आता चार भिंती पाहण्यापलीकडे काहीच राहिले नाही”
2 पुणेकरांना हक्काचे पाणी
3 ‘पूरबघ्यां’चा सूचनांकडे काणाडोळा
Just Now!
X