News Flash

छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

प्रियदर्शनी निकाळजेने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे

छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेविरोधात ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेने ५० लाखांची खंडणी मागितली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी छोटा राजन टोळीतील धीरज साबळे आणि छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी प्रियदर्शनीसह एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे.

राजेश जवळेकर या फिर्यादीने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांकडील तक्रार मागे घ्यावी आणि दुसऱ्या पत्नीला घटस्फोट द्यावा यासाठी छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप राजेश जवळेकर यांनी केला आहे. याप्रकरणी धीरज साबळे, प्रियदर्शनी निकाळजे आणि मंदार वाईकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज साबळेला अटक करुन शनिवारी न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायलयाने १६ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

राजेश जवळेकर हे धीरज साबळेच्या सांगण्यावरुन प्रियदर्शनी निकाळजेला भेटायला गेले होते. तेव्हा प्रियदर्शनीने, “मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. आमचा डीएनए एकच आहे. जर तुला जीव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून आलेला फोन मी सांगितल्याशिवाय घ्यायचा नाही. ” अशी धमकी दिल्याचे जवळेकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिने पिस्तुल काढून माझ्यावर रोखले आणि ” जर माझे ऐकले नाहीस तर यातल्या दहाच्या दहा गोळ्या घालून तुला ठार करेन” अशी धमकी दिल्याचेही जवळेकर यांनी म्हटलं आहे.

आता याप्रकरणी प्रियदर्शनी निकाळजे, मंदार वाईकर आणि धीरज साबळे यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मंदार वाईकर हा छोटा राजनचा राईट हँड म्हणून ओळखला जातो. तर धीरज साबळे हा पोलिसांचा मुलगा आहे. प्रियदर्शनी निकाळजेविरोधात पुण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 8:28 am

Web Title: pune police file case against chhota rajans niece in extortion case scj 81 svk 88
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये ८ तर पुण्यात ७ जण करोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा १५ वर
2 पारधी मुलांच्या आश्रमशाळा वास्तूसाठी पुण्यातील युवकांची धडपड
3 पुण्यातील १० करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, विभागीय आयुक्तांची माहिती
Just Now!
X