News Flash

टाळेबंदीत पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात

ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांचा भरोसा कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : शहरात कठोर निर्बंध घालण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांचा ‘भरोसा कक्ष’ तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील १३६ ज्येष्ठ नागरिकांना मदत पोहोचविण्यात आली. रुग्णालयात जायचे आहे, गॅस संपला, जेवणाचा डबा तसेच औषधे हवी आहेत, किराणा माल, भाजी हवी आहे, अशा प्रकारची मदत ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे मागितली होती.

ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांचा भरोसा कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या १९० ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या  संपर्कात आहेत. शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात येत असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातील तीन ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना अन्न, पाणी तसेच औषधांचे वाटप करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहायक फौजदार अडसुळ, शिंदे, कांबळे, चाबुकस्वार, गायकवाड आदी ज्येष्ठ नागरिकांच्या  समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ज्येष्ठांसाठी दूरध्वनी

शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवण्यासाठी :-  ज्येष्ठ नागरिक कक्ष , हेल्पलाईन क्रमांक १०९० आणि ०२०-२६११११०३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 1:05 am

Web Title: pune police helping hand to the senior citizens during lockdown zsws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांची अडवणूक नको
2 coronavirus : करोनाबाधित भागातील ४८ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण
3 आजार लपवू नका, बिनधास्त सामोरे जा!
Just Now!
X