News Flash

पुण्यात व्हॉट्स अ‍ॅप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी

शहरात पाच महिलांनी त्यांचे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलीस स्टेशनला दाखल केल्या आहेत

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आतापर्यंत पुणे पोलिसांकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्याने आता पोलिसांनी या संदर्भात अर्लट जारी केले आहे. विशेष म्हणजे या पाचही तक्रारी महिलांकडूनच दाखल करण्यात आलेल्या आहेत.

या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे.

लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांचे व्हॉटस अ‍ॅप अकाउनंट हॅक केले व त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.

फेसबुक, व्हॉटस अॅप यासारख्या सोशल माध्यमांवर सध्या सर्वाधिक नागरिक सक्रिय आहे. दरम्यान काही कंपनी व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून नागरिकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईलवर मेसेज करून ओटीपी नंबर मागितला जात आहे. त्यातून संबधित व्यक्तीची सर्व माहिती मिळवली जात आहे व त्यातूनच फसवणुकीच्या घटना पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 10:50 am

Web Title: pune police issues alert after five women say whatsapp were hacked msr 87
Next Stories
1 रेल्वेच्या पुणे विभागातून देशभरात विक्रमी संख्येने मालगाडय़ांची वाहतूक
2 पूर्णपणे यांत्रिक व्हेंटिलेटरची नवी संगणकीय रचना विकसित
3 ‘मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत’
Just Now!
X