News Flash

My Safe Pune: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम

आज या अॅपचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी हे नवीन अॅप लाँच केलं आहे. (संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या My Safe Pune या अॅपचं आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर पोलिसांसाठीच्या बदली अॅपचंही उद्धाटन करण्यात आलं.

My Safe Pune अॅपची कार्यपद्धतीः
या अॅपची निर्मिती पुणे शहरातल्या नागरिकांसाठी तसंच घटनास्थळी पोलिसांची तात्काळ सेवा मिळावी यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपची संकल्पना पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांची आहे. या अॅपच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी मदत होणार आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी: आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

घटनास्थळाची माहिती किंवा महत्त्वाच्या ठिकाणचे फोटो या अॅपवर अपलोड करता येणार आहेत. नागरिकही आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल माहिती देऊ शकतात. अशा प्रकारे फोटो अपलोड केल्याने घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश आणि वेळ नोंद केली जाईल. या अॅपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष माहिती मिळवेल आणि आजूबाजूच्या परिसरातल्या गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलला त्याची माहिती दिली जाईल.

त्याचबरोबर बीट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती या अॅपमध्ये साठवण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:21 pm

Web Title: pune police launched my safe pune app ajit pawar inaugurates the app vsk 98
Next Stories
1 शरद पवार – प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 पुणेकरांना दिलासा पण…; मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय
3 Pune MIDC Fire : मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार; अजित पवारांची घेणार भेट
Just Now!
X