News Flash

पुण्यात पोलिसांकडून ५३ लाख रूपयांचे हेरॉईन जप्त

हेरॉईनची तस्करी करणारा विशाल पोपटभाई पटेल ताब्यात

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत ५३ लाख रूपये किंमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. पुणे- बंगळुरू महामार्गावरील हॉटेल डेक्कन पॅव्हेलियनजवळ असलेल्या नवले ब्रिजजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हेरॉईनची तस्करी करणाऱ्या विशाल पोपटभाई पटेल या इसमाला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांना आरोपी विशाल पटेलकडे तब्बल ५३ लाख रूपये किंमतीचे ३८० ग्रॅम हेरॉईन सापडले. पोलिसांनी सध्या विशाल पटेलला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:27 pm

Web Title: pune police seized heroin worth rs 53 lakhs
Next Stories
1 Vidhan Parishad election Pune 2016 : पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवर अनिल भोसले विजयी; काँग्रेस, भाजपचीही मते खेचली
2 ऐन थंडीतही उन्हाळी आजार; श्वसनविकारांचाही त्रास
3 जीवघेणी जलवाहिनी
Just Now!
X