News Flash

‘या महाराजांना दंड तर होणारचं’; पुणे पोलिसांचा अस्सल पुणेरी अंदाज

सध्या याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

पुणे वाहतूक पोलिसांचा अस्सल पुणेरी अंदाज सध्यो सोशल मीडियावर सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचं कारण म्हणजे पुणे पोलिसांनी केलंलं एक भन्नाट ट्वीट. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या अस्सल पुणेरी ट्वीटमुळे पुणे पोलिस चर्चेत आले आहेत. पुणे पोलिसांच्या या नव्या संकल्पनेचं अनेकांकडून कौतुकही होत आहे. आता दुचाकीचा फोटोवर केलेल्या ट्वीटमुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

पुणे पोलिसांना टॅग करत एका व्यक्तीनं दुचाकीस्वाराचा फोटो टॅग केला होता. त्या दुचाकीच्या मागील बाजूला असलेल्या नंबर प्लेटवर एक क्राऊन (मुकूट) बनवलेला दिसत आहे. यानंतंर पुणे पोलिसांनीही आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून पुणे पोलिसांनी हा फोटो रिट्वीट केला. लवकरच चलान फाडून राजाला सन्मानित केलं जाईल, आशयाचं ट्वीट पुणे पोलिसांनी केला आहे. फॅन्सी नंबर प्लेट आपल्या गाड्यांवर लावणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्वीट केलं आहे. सध्या पोलिसांकडून अशा वाहन चालकांवर कारवाईदेखील करण्यात येत आहे.

यापूर्वीही पुणे पोलिसांच्या अनोख्या ट्वीटनं लोकांची मनं जिंकली होती. जर मी तुम्हाला अड्डा दाखवून दिला तर १० पुड्या माझ्या ना सर? अशा आशयाचं एक ट्विट एका युझरनं केलं होतं. त्यावर उत्तर देत तुम्ही सर्व पुड्या ठेवून घ्या आम्ही तुम्हाला ठेवून घेऊ, चालेल ना सर? अशा आशयाचं ट्वीट पुणे पोलिसांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 3:09 pm

Web Title: pune police tweet goes viral on social media netizens liked tweeter jud 87
Next Stories
1 Video: मुख्यमंत्रांच्या निर्णयाचे कौतुक करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा TikTok व्हिडिओ
2 सलाम! जिवघेण्या आगीतून वाचवले ९०,००० जनावरांना
3 दारुच्या बहाण्याने तब्बल 136 पुरूषांवर बलात्कार, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Just Now!
X