21 November 2019

News Flash

पुणे पोलिसांनाच हव्यात पुणेरी पाट्या, असतील तर इथे पाठवा

१०० नंबर फुकट आहे म्हणून कोणत्याही कारणासाठी डायल करू नका

पुणेरी पाट्या म्हटलं की शब्दांचा खेळ. खास पुणेरी शैलीतून अपमान करण्याची पद्धत. त्यामध्ये विनोद, राग, सुचना ह्या सर्व गोष्टी येतात. पुण्यातील अनेक दुकानांमध्ये किंवा घराबाहेर अशा अनेक पाट्या पहायला मिळतात. पुणे पोलिसांनी याच पुणेरी पाट्यांचा आधार आता प्रबोधन आणि सुचना करण्यासाठी घ्यायचा ठरवले आहे. पुणे पोलिसांनी खास पुणेरी पाट्या मागितल्या आहे. ट्विट करत पुणेकरांना पोलिसांनी पुणेरी पाट्या पाठवण्याचे अवाहन केलं आहे.

पुणे पोलिसांच्या ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे. पुणेरी पोलीस पाट्या अशी संकल्पना राबवण्यात आली आहे. पुणेरी पाट्याबाबतचा मजकूर ८९७५२८३१०० या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात या उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले होते.

खरतर पुणेरी पाट्यांचा नागरिकांशी असलेला सांस्कृतिक संबंध पाहता पुणेरी पोलिसांनी अगदी अचूक नस पकडली आहे असे म्हणायला हरकत नाही. पुणे पोलिसांचा हा पुढाकार सामान्य पुणेकरांशी कनेक्ट होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून नागरिकही या प्रयोगाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

काही पुणेरी पाट्या –

– नको बंड, नको दंड हेल्मेट घालुन, डोके ठेवू थंड

– हेल्मेट नसे त्याशी यमराज दिसे

– लोकांना आपल्यामुळे त्रास झाल्यास आपल्यालाही कायद्याप्रमाणे त्रास होईल

– १०० नंबर फुकट आहे म्हणून कोणत्याही कारणासाठी डायल करू नका

First Published on July 10, 2019 2:16 pm

Web Title: pune police twitter puneri patya nck 90
Just Now!
X