22 February 2020

News Flash

Teddy Day: पुणे पोलिस म्हणतायत कुठेही टेडी बेअर दिसला तर आम्हाला कळवा…

सोशल मीडियातून दिल्या अनोख्या शुभेच्छा

सध्या तरुणाईवर Valentine Week चा प्रभाव जाणवतो आहे. Rose Day, Chocolate Day, Friendship Day यासारख्या दिवसांच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबतचं नात अधिक दृढ करायच्या प्रयत्नात असतो. आज Teddy Day साजरा केला जात आहे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला टेडी बेअर देण्याची प्रथा आहे.

पुणे पोलिसांनीही तरुणाईच्या या रंगात रंगून जात, Teddy Day च्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. टेडी बेअर हे दिसायला क्युट असतातच…पण अनोळखी टेडी बेअर असुरक्षितच नाही तर धोकादायक असू शकतात असं ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं पोलिस खातं हे सोशल मीडियावर सक्रीय झालेलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरातील पोलिस खातं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवत असतात. पुणे पोलिसांनी काळासोबत पावलं टाकत दाखवलेलं सामाजिक भान हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे.

First Published on February 10, 2020 2:08 pm

Web Title: pune police wishes for teddy day in unique style on social media account psd 91
Next Stories
1 हॉटेलऐवजी बर्फाच्या नदीत पडला ‘तो’, Google Maps वरील विश्वास पडला महागात
2 पतीला ट्रोल करणाऱ्याला मयंती लँगरचे बोल्ड उत्तर, म्हणाली…
3 Fact Check: चीनने खरंच २० हजार कोरोना रुग्णांना ठार मारण्याची परवानगी मागितली आहे का ?
X