News Flash

पती- पत्नीच्या भांडणात गर्भवती मेहुणीची हत्या

बावधानमधील भुंडे वस्ती परिसरात राहणारा हिरा देवू चव्हाण (वय ३०) हा त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला. त्याच्यासोबत त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ देखील

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्याच्या बावधानमध्ये पती आणि पत्नीच्या भांडणात मेहुणीची हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बावधानमधील भुंडे वस्ती परिसरात राहणारा हिरा देवू चव्हाण (वय ३०) हा त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला. त्याच्यासोबत त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ देखील होता. मात्र पत्नी लक्ष्मी हिरा चव्हाण ही सासरी येत नसल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाले. लक्ष्मी यांची बहीण मुन्नीबाई जाधव (वय २५) हे भांडण सोडवायला गेली असताना हिराच्या चुलत भावाने मुन्नीबाई यांच्या मानेवर लोखंडी नळाने मारले. यानंतर हिरा व त्याच्या भावाने मुन्नीबाई यांना मारहाण केली. या मारहाणीत मुन्नीबाई यांचा मृत्यू झाला. मुन्नीबाई या गर्भवती होत्या, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 6:31 pm

Web Title: pune pregnant woman murdered in bavdhan two arrested
Next Stories
1 इतर अवाजवी वीजबिल आल्यास धास्तावू नका, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधा!
2 युती न झाल्यास एकटे लढून स्वबळावर सत्ता मिळवू
3 आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी आता पालकांच्या उत्पन्नाची अट नाही
Just Now!
X