11 August 2020

News Flash

पुणे रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट यंत्र

रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचविण्याच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट यंत्र (टीव्हीएम) कार्यान्वित करण्यात आली आहेत.

कागदविरहित तिकीट प्रणालीबरोबरच याच दिवशी मध्य रेल्वेने ‘कॅश कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम’ यंत्राचाही समावेश उपनगरीय सेवेत केला.

रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचविण्याच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट यंत्र (टीव्हीएम) कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावर उभारण्यात आलेल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाची सशुल्क सुविधाही प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या योजनेनुसार पुणे स्थानकावर स्वयंचलित तिकिटांची चार यंत्र बसविण्यात आली आहेत. या यंत्राचा वापर करून प्रवाशांना थेट तिकीट मिळू शकणार आहे. तिकिटासाठी चलनी नोटा, नाणी किंवा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात यंत्राद्वारे रकमेचा स्वीकार केला जाणार आहे. नोटा व नाण्यांच्या माध्यमातून तिकिटाची योग्य रक्कम यंत्रामध्ये गेल्यानंतरच संबंधित प्रवाशाला तिकीट मिळू शकणार आहे. स्थानकावरील वेळ वाचविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रवाशांनी या यंत्रणेचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे विभागातील कोल्हापूर व मिरज या स्थानकांवरही प्रत्येकी दोन यंत्र लावण्यात आली असून, ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पुणे स्थानकावर वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, प्रवाशांसाठी ही सशुल्क सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्थानकाच्या फलाट क्रमांक एकलगत (सोलापूर एन्ड) हे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 3:25 am

Web Title: pune railway station automatic ticket machine
Next Stories
1 चिंचवडचे नामकरण चापेकरनगर करावे – वा. ना. उत्पात
2 वाघोलीच्या कुटुंबातील चौघांचा मोटार कालव्यात पडून मृत्यू
3 शाळांची ‘खरी कमाई’ लॉटरीच्या विक्रीतून
Just Now!
X