28 October 2020

News Flash

… तर माझं कुटुंब वाचलंच नसतं; नुकासानधारकाचे डोळे पाणावले

पुण्यातील जनता वसाहत येथे पाईपलाईन फुटली

पुणे शहरातील जनता वसाहतमध्ये पर्वती जलशुद्धीकरण येथे शुक्रवारी रात्री ४५ वर्ष जुनी पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर ९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील नुकसानग्रस्त रहिवासी सूर्यकांत लोखंडे म्हणाले की, आमच्या वसाहतीमध्ये रात्री पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेत डोळ्यासमोर घराच्या भिंती पडल्या आणि संसार वाहत गेल्याचे पाहून सर्वच संपल्यासारखे झाले. पण हीच घटना झोपेत असताना घडली असती, तर माझं कुटुंबच वाचलेच नसते, हे सांगताना डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

या घटनेतील नुकसान ग्रस्त रहिवासी सूर्यकांत लोखंडे म्हणाले की, मी, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही सर्व जण काल रात्री गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात भूकंप झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे नेमके काय झाले आहे. म्हणून घराबाहेर येऊन पाहतो, तर पाण्याचा लोंढा वाहत येत असल्याचे दिसले. तसा मी दोघांना घराबाहेर घेऊन आलो आणि माझ्या घरात पाणी शिरले. या पाण्यात माझ्या घराच्या भिंती पडल्या, घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे. हे पाहून सर्वच संपल्यासारखे झाले. आता आमच्याकडे काहीच राहीले नाही. पण जर आम्ही झोपी गेलो असतो आणि तेवढ्यात ही घटना घडली असती, तर माझ कुटुंब वाचल नसत. हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:41 pm

Web Title: pune rain janata vasahat 9 injuerd parvati water treatment plant nck 90 svk 88
Next Stories
1 पुणे : तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलेला धमक्या, शिवीगाळ
2 पुण्यात माणुसकीला लाजवणारी घटना, करोनाच्या भीतीपोटी सहा तास मृतदेह घरातच होता पडून; अखेर…
3 ‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती
Just Now!
X