पुण्यात जुलै महिन्यात अपवादात्मरित्या झालेल्या दमदार पावसानंतर, ऑगस्ट महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसाने विक्रम केला आहे. स्कायमेटकडील पावसाच्या नोंदीनुसार पुण्यात जुलै महिन्यात तब्बल ३५६.२ मिमी पाऊस झाला. जो साधारणपणे १८७ मिमी पर्यंत होत असतो. तर ऑगस्टमध्ये १९२ मिमी झालेला पाऊस हा मासिक सरासरी १२२.३ मिमी पावसापेक्षा बराच जास्त आहे.

शहरात झालेल्या पावसाप्रमाणात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस हा सर्वाधिक होता. त्यांनतर ७ ऑगस्टच्या पुढे शहरात सुरू असलेला पाऊस हा हलक्या स्वरूपाचा व वातावरणात ओलावा निर्माण करणारा आहे. तसेच, तेव्हापासून एकही दिवस मुसळधार पाऊस न होता अशीच परिस्थिती कायम आहे.
पुण्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने वर नमूद केल्याप्रमाणे मासिक सरासरी ओलांडली आहे. हा केवळ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाचा परिणाम आहे. २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान शहरात एकूण १४८.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील पावसाचे प्रमाण –
१ ऑगस्ट – ६.३ मिमी, २ ऑगस्ट- १८.८ मिमी, ३ ऑगस्ट – २०.४ मिमी, ४ ऑगस्ट – ४५.९ मिमी, ५ ऑगस्ट -४१.१ मिमी, ६ ऑगस्ट -२२.१, ७ ऑगस्ट -६.२ मिमी, एकूण पाऊस – १६०.८ मिमी,

सध्या शहराच्या काही भागात आगामी दोन ते तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जो की मुसळधार नसेल मात्र मध्यम तीव्रतेचा राहील. त्यानंतर वातावरण कोरडे होण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले आहे. पावासाचे शहरात २६ ऑगस्टच्या सुमारास पुनरागमन होऊ शकते. हा पाऊस दोन दिवस सातत्याने राहू शकतो. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील.