09 March 2021

News Flash

स्वच्छ स्पर्धेत पुणे देशात १५व्या क्रमांकावर

कामगिरीत सुधारणा, पण पहिल्या दहामध्ये स्थान नाही

संग्रहित छायाचित्र

केंद्र पातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला १५ वा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात शहर चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी देशपातळीवर शहर ३७ व्या स्थानी होते. तर राज्यात ८ व्या क्रमांकावर होते. यंदा मानांकनात आणि कामगिरीत सुधारणा झाली असली, तरी पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्यास शहराला अपयश आले आहे.

केंद्राकडून स्पर्धेच्या निकालांची ऑनलाइन पद्धतीने घोषणा करण्यात आली. देशातील प्रमुख शहरासांठी दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. केंद्राच्या या स्पर्धेत पुणेही सातत्याने सहभागी होत आहे. गेल्या वर्षी शहराला अपेक्षित स्थान मिळाले नव्हते. देशपातळीवर स्वच्छ शहरांच्या यादीत शहर ३७ व्या स्थानावर फे कले गेले होते. त्याचे तीव्र पडसादही शहरात उमटले होते. कोटय़वधी रुपये खर्च करून महापालिके ने काही सल्लागारांची नियुक्ती के ली होती. तरीही कामगिरीतील उणिवा स्पष्ट झाल्यामुळे यंदा महापालिके कडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.

नागरिक सहभाग वाढविणे, ठोस उपाययोजना करणे, नागरिकांच्या तक्रारींची पूर्तता करण्याला महापालिके कडून प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात आल्या. केंद्राच्या पथकाकडून जानेवारी महिन्यात शहरात राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची त्रयस्थ पद्धतीने पाहणी करण्यात आली. तक्रारींची पूर्तता, स्वच्छ स्पर्धेतील निकषांचे पालन, कचरामुक्त शहर अशा उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

त्यामध्ये कचरा मुक्त शहर स्पर्धेत महापालिके ला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन जाहीर करण्यात आले होते. दर तीन महिन्यांनी महापालिका करत असलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर या स्पर्धेतील एकू ण गुण जाहीर करण्यात आले. एकू ण सहा हजार गुणांपैकी शहराला ४ हजार ४७७.३१ गुण प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, या संदर्भात बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, की यंदा या स्पर्धेसाठी सातत्याने ठोस उपाययोजना करण्यात आल्या. लोकसहभागही वाढविण्यात आला. त्यामुळे गतवर्षीपेक्षा शहराच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षी शहराला दोन स्टार रेटिंग होते. यंदा ते तीन स्टार झाले आहे. यापुढेही ठोस उपाययोजना राबविण्याला प्राधान्य राहणार असल्याची माहिती या वेळी पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नागरिकांचा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिके च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडूनही त्रुटी दूर करून ठोस उपाययोजनांना प्राधान्य दिले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहराची कामगिरी सुधारली आहे, हे दिसून येत आहेत. सामूहिक प्रयत्नातूनच हे साध्य झाले आहे.

– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:02 am

Web Title: pune ranks 15th in the country in clean competition abn 97
Next Stories
1 ठोस उपाययोजना करण्यास वाव
2 अडीच कोटी खर्चून शालेय साहित्य खरेदीचे विषयपत्र मागे घेण्याची नामुष्की
3 पुण्यात दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू,१ हजार ६६९ नवे करोनाबाधित
Just Now!
X