पीएमएमआरडीचा प्रकल्प अहवाल तयार; चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी-पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) तयार करण्यात आला असून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हा डीपीआर जमिनीची किंमत वगळून तब्बल १३ हजार ३१५ कोटींचा आहे. पुढील महिन्यात वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात होणार असून चार महिन्यांत पहिल्या टप्प्यातील सातारा रस्ता ते नगर रस्ता या तीस कि.मी. लांबीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Exposed falsehood through RTI Commencement order of Lower Panganga Project without approval of Water Commission
यवतमाळ : माहिती अधिकारातून खोटारडेपणा उघड! जल आयोगाच्या मान्यतेशिवाय निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी…
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

वर्तुळाकार रस्त्याच्या प्रस्तावित आखणीतील बदलांना आणि वाढीव रुंदीबाबतच्या बदलांना एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ मधील कलम २०(४) अन्वये एप्रिल महिन्यात शासनाकडून मान्यता मिळाली आहे. प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणून सातारा रस्ता ते नगर रस्ता हा तीस कि.मी. लांबीचा भाग घेण्यात आला आहे. सातारा रस्ता, सोलापूर रस्ता आणि नगर रस्ता यांना एकत्र जोडणारा रस्ता होणार असून ३.७५ कि.मी. लांबीत बोगदे होणार आहेत. सासवडचा रस्ता एकत्रित येणार असल्याने वडकीला येथे स्थानक (जंक्शन) होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी मंगळवारी दिली.

निविदेचे काम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. महापालिका क्षेत्रातून येणाऱ्या आणि वर्तुळाकार रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यांवर जाणाऱ्या (वर्तुळाकार रस्त्याला पूरक रस्ते) रस्त्यांचे काम समांतर पातळीवर सुरू राहणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पातील रस्ते दहा पदरी असणार असून जमीन हस्तांतर करताना त्यानुसारच केली जाणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात चार पदरी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.

पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याची वैशिष्टय़े

* १२९ कि.मी. लांबी, दहा पदरी आणि ११० मीटर रुंदीचा रस्ता

* १७ हजार ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित; संपूर्ण मार्ग सिग्नलमुक्त

*  नगर रचना योजनेतील सुमारे पाचशे हेक्टर जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी. त्याद्वारे पीएमआरडीए क्षेत्रात २ लाखांहून अधिक घरे उपलब्ध होणार

प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील संबंधित गावांना भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना प्रकल्पाचे मॉडेल समजून सांगण्यात आले आहे. ज्या गावात नगररचना योजना राबविण्यात येणार आहे, त्याची सीमाही ग्रामस्थांना दाखविण्यात आली आहे. ऐंशी टक्के शेतकऱ्यांची मान्यता मिळाली आहे.  विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच रिंगरोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात या भागाची निवड केली आहे.

किरण गित्ते, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण