News Flash

VIDEO : पुण्यात परंपरागत सगर उत्सवाचं आयोजन

गेल्या ७० वर्षांपासून गवळी समाजातील बांधवांनी आपली परंपरा जपली आहे.

पुण्यात भाऊबीजेच्या निमित्ताने गणेश पेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यवसायिक संघाच्यावतीने सगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सगर म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसंच त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.

गेल्या ७० वर्षांपासून गवळी बांधवांनी आपली परंपरा जपली आहे. तर आज या सगरमध्ये पुणे जिल्हयातील १०० हून अधिक रेडे आणि म्हशी यांची मिरवणूक वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रेड्याच्या मालकाचा विशेष सत्कार म्हणून फेटा बांधून पितळी तोडा देऊन सन्मान केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 2:40 pm

Web Title: pune sagar festival celebrated on second day of diwali jud 87
Next Stories
1 कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख बहिणींना वाटणार साड्या
2 दिवाळी भेट ! बहुप्रतिक्षित विमानसेवेला अखेर सुरूवात, नाशिक-पुणेकरांना दिलासा
3 पुण्यातील दिवाळी फराळाची परदेशामध्ये गोडी!
Just Now!
X