पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन विभागाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला आज अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची माहिती मिळाली. या परिसरात अनेक कंपन्या देखील असल्याने त्यांना या आगीची झळ बसता कामा नये.
त्या दृष्टीने घटनास्थळी आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने, धुराचे लोट आसपासच्या भागात पसरले आहे. तर ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असून नेमकी ही आग कशामुळे लागली. हे अद्याप पर्यंत सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:54 pm