22 November 2019

News Flash

पुणे : गहुंजेच्या सरपंच शीतल बोडके यांना पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

महिला सरपंचावरच असा प्रसंग ओढवल्याने खळबळ उडाली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील गहुंजे गावच्या सरपंच शीतल किरण बोडके यांना पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. स्वतः शीतल यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. महिला सरपंचावरच असा प्रसंग ओढवल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल बोडके (वय २८) या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम असलेल्या गहुंजे गावच्या सरपंच आहेत. त्यांनी पती किरण बोडके यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पती आपल्याकडे वारंवार माहेरहून दोन कोटी रुपये घेऊन ये असा तकादा लावतात. तसेच आपल्या पतीचे बाहेरील महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही शीतल बोडके यांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी याच कारणावरुन त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आरोपी पती किरण बोडके यांनी पत्नी शीतल यांचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे शीतल यांनी तक्रारीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

First Published on June 25, 2019 2:06 pm

Web Title: pune sarpanch of gahunje tried to kill from her husbund aau 85
Just Now!
X