सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिल्या वर्षाचा इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर बुधवारी फुटला. कोथरूड येथील एमआयटीमधून सव्वा दहाच्या सुमारास तो व्हायरल झाल्याची बाब समोर आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिल्या वर्षाचा इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले की,कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयामधून पेपर व्हायरल झाल्याचे समजत आहे.या प्रकरणी विद्यापीठाचे चौकशी पथक पाठविले असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले,