पुण्यातील सीरम इन्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता वरच्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळले. हे सर्वजण बांधकाम मजूर असण्याची शक्यता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आगीतून वाचलेल्या अविनाश कुमार याने आपला भाऊ आगीत गमावला आहे. भावासोबत तोदेखील इमारतीत होता. अविनाशने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीव वाचवला, पण त्याचा भाऊ बिपीन खाली आलाच नाही. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना त्याने घडलेला प्रसंग सांगितला.

सीरम इन्सिट्यूटच्या आगीमागे घातपात? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

“आम्ही २२ तारखेपासून येथील इमारतीमध्ये काम करीत होतो. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरुन धूर येत असल्याचं दिसलं. पण काही वेळाने मोठी आग दिसली. सर्वत्र धूर आणि काही अंतरावर आग दिसत होती. आमची जीव वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली. मी भावाला ‘भाई चलो जल्दी’ म्हटलं, पण तो काही आलाच नाही. त्याचदरम्यान मी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीजवळ आलो आणि तेथून खाली असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर उडी मारली. त्यामुळे माझा जीव वाचला. पण माझा भाऊ आलाच नाही,” सांगताना अविनाश कुमारला भावना अनावर होत होत्या.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आगीच्या तडाख्यात

“आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.