01 March 2021

News Flash

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग आटोक्यात

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग

(Express Photo: Ashish Kale)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचं लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलं असतानाच ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Live Blog

17:04 (IST)21 Jan 2021
आग आटोक्यात

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासांनी नियंत्रण मिळण्यात आलं आहे. सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झालेली नाही.

17:02 (IST)21 Jan 2021
अजित पवारांची प्रतिक्रिया

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणं आणि सोबतच हानी टाळणं याला प्राधान्य आहे असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

16:44 (IST)21 Jan 2021
अडकलेल्यांना बाहेर काढण्याला प्राधान्य - अदर पूनावाला

तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं आहे. 

16:37 (IST)21 Jan 2021
पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आगीची माहिती
16:35 (IST)21 Jan 2021
नऊ जणांना बाहेर काढण्यात यश

आगीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

16:33 (IST)21 Jan 2021
तासाभरात आगीवर नियंत्रण येईल - पुणे पोलीस आयुक्त

"दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आतापर्यंत सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, कोणीही अडकलेलं नाही. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे. इमारतीत कोणतंही उत्पादन होत नव्हतं असं सीरमने आम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी कोव्हिशिल्डची कोणतीही निर्मिती होत नव्हती," अशी माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 

16:30 (IST)21 Jan 2021
एनडीआरएफची टीम रवाना

एनडीआरएफची एक टीम सीरम इन्स्टिट्यूकडे रवाना झाली आहे. आग आणि त्यामुळे झालेला धूर यामुळे बचावकार्यात सहकार्य करण्यासाठी एनडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. 

16:24 (IST)21 Jan 2021
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधील भीषण आगीचे फोटो

16:20 (IST)21 Jan 2021
आगीत अडकलेल्या तिघांची सुटका

अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाच मजल्यांची इमारत असून तीन माळ्यांवर आग पसरली आहे. धुराचं प्रमाण जास्त आहे. चार लोक अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिघांना आम्ही सुखरुप बाहेर काढलं असून अजून शोध सुरु आहे".

16:19 (IST)21 Jan 2021
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमुळे करोना लसीच्या निर्मितीला फटका बसणार का?

मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

16:19 (IST)21 Jan 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील  निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे.

Next Stories
1 सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमुळे करोना लसीच्या निर्मितीला फटका बसणार का?
2 पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग
3 आजही वैचारिक गुलामगिरी पूर्णपणे संपलेली नाही – उर्मिला मार्तोंडकर
Just Now!
X