पुणे : कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सिंहगड पायथ्यालगतच्या १४ गावांना विनामूल्य आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ‘आपलं घर’ संस्थेच्या श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता मिळण्याबाबतच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत. जिल्हा परिषदेकडून पक्का रस्ता करून देण्याचे मान्य करण्यात आल्यानंतर गोळेवाडीपासून रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार होते. मात्र वन विभागाने या कामावर स्थगिती आणली आहे. वन विभागाकडून रस्त्याच्या कामात अडथळा आणण्यात येत असल्यामुळे रुग्ण, अनाथालयातील मुले आणि वृद्धांना सरकारी अनास्थेची झळ बसत आहे.

स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशनच्या आपलं घर या संस्थेकडून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोणजे-गोळेवाडी भागात श्रीमती कौसल्या ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून अतीदुर्गम भागासाठी फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरू आहे. गोळेवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर हे सुसज्ज रुग्णालय आहे. मात्र पक्क्य़ा रस्त्याअभावी रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी येत असल्यामुळे आणि सातत्याने मागणी करूनही पक्का रस्ता होत नसल्यामुळे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. रुग्णालयाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. जिल्हा परिषदेने कच्च्या रस्त्याची तात्पुरती डागडुजीही केली. पक्का रस्ता करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळेल, असे वाटत असतानाच वन विभागाकडून डांबरीकरणाला स्थगिती आणण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याचे कामही रखडले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

वन विभागाने ही स्थगिती उठवावी, यासाठी जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्य वनसंरक्षक व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. स्थगिती उठविण्यात यावी यासाठी मांढरे आणि अन्य अधिकारी सिम्बायोसिस समोर असलेल्या वन खात्याच्या कार्यालयात सातत्याने चकरा मारत आहेत. मात्र स्थगिती उठविण्याबाबतचे पत्र देण्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. सध्या रस्त्याच्या अध्र्या भागात खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आपलं घर ते गोळेवाडी या एक किलोमीटर अंतरातील संपर्कही तुटला आहे. संस्थेतील अनाथ मुलांसाठी दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू संस्थेपर्यंत पोहोचविणेही त्यामुळे कठीण झाले आहे.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र वन विभागाने डांबरीकरणास स्थगिती दिल्यामुळे संस्थेतील अनाथ मुले, वृद्धांना त्याचा फटका बसतो आहे.

– विजय फळणीकर,

अध्यक्ष, स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशन