मुंबई- बेंगळूरु महामार्गावर टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, पाच प्रवासीही जखमी झालेत. मुंबई- बेंगळूर महामार्गावर पाषाण जवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईवरून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालक मोहन उत्तमराव बांदल आणि वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण यांनी एसटी रस्त्याच्या बाजूला थांबवली व ते खाली उतरून पाहणी करत होते. त्यावेळी काही प्रवासीही खाली उतरले होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. यामध्ये बांदल आणि चव्हाण यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, बांदल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, चव्हाण यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

याप्रकरणी अभिजित मोहन बांदल (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक राजीव सुंदरम गांधी (वय 36, रा. उलुंडरपेट, जि. विल्लपुरम, तामिळनाडू) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.