23 September 2020

News Flash

पुणे: सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित मुलीचा सावत्र बाप रात्रपाळी करून घरी परतला, तर आई त्याच कंपनीत दिवसपाळीमध्ये कामाला गेली होती.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

सावत्र बापानेच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, त्यानंतर तिचा आरोपीसोबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला होता. ते एकाच कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळी दरम्यान काम करत होते. रविवारी(दि.२) पीडित मुलीचा सावत्र बाप रात्रपाळी करून घरी परतला, तर आई त्याच कंपनीत दिवसपाळीमध्ये कामाला गेली होती. घरात पीडित १३ वर्षीय मुलगी आणि सावत्र वडील हेच होते. घरात कोणी नसल्याने नराधमाने  मुलीवर बळजबरी करत बलात्कार केला. आई कामावरून परत आल्यानंतर हा सर्व प्रकार १३ वर्षीय पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यांनी थेट आळंदी पोलीस ठाणे गाठत आरोपी पतीविरोधात फिर्याद दिली. आळंदी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी हा मूळ मध्य प्रदेश येथील असून फिर्यादी पत्नी ही अरुणाचल प्रदेश येथील आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जोंधळे हे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 10:43 am

Web Title: pune step father rapes minor girl
Next Stories
1 आता पर्जन्यजल व्यवस्थापनासाठी धावपळ
2 क्रिकेटला वाहिलेला अनोखा ‘क्रिककॅफे’!
3 मुलाखत : आवड निवड ओळखा, तर पर्याय समजतील
Just Now!
X