News Flash

पुणे : पॅनकार्ड क्लब इमारतीच्या डोमला भीषण आग

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला आज सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या आगीत इमारतीचा संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीमुळे आकाशात धुराचे मोठाले लोळ उठत आहेत. आग मोठ्याप्रमाणवर असल्याने ती विझवण्यात जवानांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 2:01 pm

Web Title: pune the fire at the dome of the pancard club building msr 87
Next Stories
1 आणखी दोन दिवस राज्यात गुलाबी थंडी
2 जेएनयू घटनेच्या निषेधार्थ पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थीचे प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन
3 अब्दुल सत्तार यांच्याबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Just Now!
X