पुण्यात शुक्रवारी संध्याकाळी तिहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली होती. या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले असून एका आरोपीला पकडण्यात आले आहे. पुण्यातील सोमवार पेठेत असलेल्या नागझरी नाल्याजवळ तीन मृतदेह सापडले होते. हे हत्याकांड कचरा गोळा करण्याच्या क्षुल्लक कारणावरून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकी परदेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून इतर दोघेजण फरार आहेत. मुन्ना आणि बाबू अशी फरार आरोपींची नावे आहेत.

पुण्याच्या हत्याकांडातील दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. मृतांपैकी एकाचे नाव नाविद शेख असे आहे तर दुसऱ्याचे संदीप अवसरे असे नाव आहे. तिसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार पेठेतील नागझरी या नाल्यात शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एका मृतदेह आढळून आला. या मृतदेहाबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आणि या प्रकरणाचा छडा लावला. विकी परदेशीला या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.तर फरार दोन आरोपींचा शोध घेतला जातो आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील समर्थ आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागझरी नाल्याजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास १२ ते २१ वयोगटातील तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले होते. आता या हत्याकांडाचे गूढ उकलले आहे.