News Flash

पुणे : करोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या दोघांना अटक

आजवर अनेक नागरिकांना बनावट रिपोर्ट दिले असल्याचे केले कबूल

संग्रहीत

पुण्यातील शिवाजीनगर भागात एका लॅब मार्फत करोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या दोघांना अटक करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. आजवर अनेक नागरिकांना बनावट रिपोर्ट दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

सागर अशोक हांडे (वय 25 रा. संगम चौक, मु.नांदेड) दयानंद भिमराव खराटे (वय 21 रा. वारजे माळवाडी) अशी आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडवर असलेल्या एका लॅबमध्ये बनावट करोना तपासणीचे रिपोर्ट दिले जात आहे, अशी माहिती एका व्यक्ती मार्फत मिळाली होती. त्यानुसार तेथील लॅब मधील सागर अशोक हांडे आणि दयानंद भिमराव खराटे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं व चौकशी केली असता, त्या आजवर अनेकांना बनावट रिपोर्ट दिल्याची दोघांनी कबुली दिली.

तसेच आणखी या प्रकरणात हे दोघे सहभागी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांची अधिक चौकशी सुरू असल्याचे डेक्कन पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 9:37 pm

Web Title: pune two arrested for giving fake report of corona msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे महानगरपालिकेकडून करोना ‘ब्रेक द चेन’साठी सुधारित आदेश
2 पुण्यातील खळबळजनक घटना : बेड न मिळाल्यानं करोनाबाधित महिलेनं घेतला गळफास
3 ‘आयसीएसई’च्या दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित
Just Now!
X