26 January 2020

News Flash

पुण्यात झालेल्या गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू

या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील हडपसर येथील गंगानगरमध्ये झालेल्या गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत. पंचय्या सिद्धय्या स्वामी असे वयोवृद्ध मयताचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गंगानगर येथील गल्ली क्रमांक 10 येथून आज सायंकाळच्या सुमारास फूटपाथ वरून पंचय्या सिध्दय्या स्वामी हे जात होते. तेव्हा तेथून काही अंतरावर मयूर गुंजाळ आणि तेजाब कल्याणी यांच्यात काही जुन्या गोष्टींमधून वाद झाला. त्यावेळी तेजाब याने मयूरच्या दिशेने गोळी झाडली. परंतु ती गोळी फुटपाथवरून चालले स्वामी यांच्या मांडीला लागली. त्यानंतर स्वमी हे खाली कोसळले.

दरम्यान, ही घटना पाहताच परिसरातील नागरिकांनी स्वामी यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच नेमके काय घडले याबाबतचा तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

First Published on August 14, 2019 11:05 am

Web Title: pune two men fight aged man died in firing police investigation jud 87
Next Stories
1 पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी
2 स्वतंत्र पोलीस आयुक्तालयानंतरही पिंपरीतील गुन्हेगारी कायम
3 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘व्यवसाय शिक्षण’चे विद्यार्थी
Just Now!
X